सोलापूर दि. 23 (जि. मा. का.) – मा. राज्य निवडणूक आयोग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर येथे आचारसंहिता कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी हा कक्ष पूर्णवेळ कार्यरत राहणार असून नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात येईल.
संपर्क क्रमांक:
- 9607980100
- 9607980200
ही माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी दक्षिण सोलापूर किरण जमदाडे यांनी दिली आहे.
******

0 Comments