Advertisement

Main Ad

माघी वारी- पश्चिमद्वार ते चौफाळा मार्ग वारकरी/भाविकांसाठी एकेरी रहदारी



सोलापूर दि.23 (जिमाका):- चालू वर्षी माघ यात्रा सोहळा 2026 वार- गुरूवार, दि.29 जानेवारी 2026 रोजी अंपन्न होत असून यात्रेच्या अनुषंगाने सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील प्रस्ताव क्र.गो जा क्र.3578778/2026 दि. 16/01/2026 अन्वये, पंढरपूर शहरामध्ये माघ यात्रा सोहळा दि.23जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 या कालावधीत असून माघ यात्रेसाठी सुमारे 03 ते 04 लाख भाविक शहरात येतात. दि.28 जानेवारी 2026 रोजी दशमी व दि.29 जानेवारी 2026 रोजी एकादशी असून माघ यात्रेकरिता आलेले भाविक चंद्रभागा नदीपात्रातून महाद्वार घाट, महाद्वार चौक, उत्पात गल्ली व इतर बोळातून श्री संत नामदेव महाराज पायरी याठिकाणी येत असतात व दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा करतात, ही परंपरा आहे. त्यामुळे मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी प्रशासनास अडचणी निर्माण होतात. मंदिराकडून बाहेर पडणेसाठी पश्चिमद्वार ते चौफाळा हा एक महत्वाचा मार्ग आहे, त्यामुळे सदर मार्गावरून मंदिराकडे प्रवेश दिल्यामुळे वारकरी यांची ये-जा चालू राहून गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी /भाविक हे श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारुती चोक - महाद्वार चौक मार्ग नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी / भाविकांना बाहेर पडणेचा एकेरी रहदारी मार्ग केलेस गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी / भाविकांसाठी बाहेर पडणेकरीता एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे असल्याने त्याबाबत योग्य ते आदेश होणेची विनंती सहा पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी सादर केली आहे.
आणि माघ यात्रा सोहळयाकरीता लाखो भाविक पंढरपूर शहर व परीसरात येतात व एकादशी सोहळयादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतात तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्सीचा वापर करावा लागतो.
 दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरविणेत येणा-या सोई सुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तथापि, पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता प्रशासनाकडून दर्शनरांग व्यवस्थापन करून गर्दी आटोक्यात आणण्याची कार्यवाही केली जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाणारे रस्ते अरुंद असून त्या ठिकाणी येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होऊन जीवित हानी टाळण्यासाठी 
जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 (क) अन्वये माघ यात्रा सोहळा -2026 मधील दि. 28 जानेवारी 2026 सकाळी 06 ते दि. 29 जानेवारी 2026 रोजीचे सायंकाळी 06 वाजेपर्यंत पश्चिम द्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी/ भाविकांकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश दिले आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन झालेस उल्लंघन करणारे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 नुसार तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कारवाईस पात्र राहील.
0000

Post a Comment

0 Comments