Advertisement

Main Ad

बीड जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलिसांची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या; बीड

 जिल्हा पोलीस दलातून हळहळ ( बीड जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम प्रतिनिधी. बीडमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवुन जीवन संपविले आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. हा पोलीस कर्मचारी माजलगांव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. बाळकृष्ण जायभाय (वय 55) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्या मागचं कारण समोर आले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत. बाळकृष्ण जायभाय हे बीड जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष मनमिळावू सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जात होते. यापूर्वी बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलीस ठाण्यात त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. त्यामुळे ते बीड जिल्ह्यात चांगलेच परिचित होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पोलीस दलात आणि आसपासच्या परिसरांत हळहळ व्यक्त केली जात आहे.*

Post a Comment

0 Comments