सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र परिवार वतीने इतर ठिकाणाहून सोलापूर शहर जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करणे सन्मान करणे सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शासन दरबारात प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निवेदन पत्रव्यवहार करणे पोलिसांच्या सुट्ट्या रजा त्याच बरोबर पोलीस अधिकारी /कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करणे शुभेच्छा देणे चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा सत्कार करणे यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी /कर्मचारी यांच्या समस्या अडचणी राज्य सरकारकडे मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे पोलिसांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा होऊन पोलीस मित्र परिवार सोलापूर शहर अध्यक्ष पदी एजी न्यूज चे युवा संपादक अंबादास गज्जम यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू व युवा पत्रकार नितीन साठे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अंबादास गज्जम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी यशवंत पवार अमोल कुलकर्णी रमेश दग्गारी लक्ष्मण सुरवसे इत्यादी उपस्थित होते.

0 Comments