Advertisement

Main Ad

सोलापूर जिल्हयात सण, उत्सव व विशेष दिनादिवशीध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जाहीर


               सोलापूर दि.12 (जिमाका):- सोलापूर जिल्ह्यात वर्षभरामध्ये साजरा करण्यात येणाऱे सण, उत्सव व विशेष दिनादिवशी सकाळी 6.00 वाजलेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट जाहिर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी जारी केले आहेत.
           सोलापूर जिल्हयात वर्षभरामध्ये साजरा करण्यात येणारे सण, उत्सव व विशेष दिन पुढीलप्रमाणे,
दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकरसंक्रांत व श्री. सिध्दरामेश्वर यात्रा सोलापूर, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सांगता मिरवणूकीचा दिवस, गणपती उत्सवादरम्यान दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी पहिला दिवस, दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी दहावा दिवस व दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशी असे 3 दिवस, नवरात्री उत्सवा निमित्त, दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी अष्टमी व 20 ऑक्टोबर 2026 रोजी नवमी असे 2 दिवस, दिनांक 8 नोव्हेंबर 2026 रोजी दिपावली लक्ष्मीपूजन 1 दिवस, दिनांक 25 डिसेंबर 2026 रोजी ख्रिसमस 1 दिवस उर्वरित 5 दिवस महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार देण्यात येईल.
ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 नियम 5 मधील सुधारित उपनियम (३) नुसार त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. सदरचा आदेश हा सोलापूर जिल्हयाचे हद्दीत लागू राहिल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000

Post a Comment

0 Comments