सोलापूर दि. 12 (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठीच्या अंतिम मतदार याद्या दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर याद्या जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघ निहाय सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
तसेच सदरच्या याद्या जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरु असून, ज्या पदवीधर व शिक्षक मतदारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जावून मतदार नोंदणी करून घ्यावी. तसेच, संबंधित तहसिल कार्यालय व पदनिर्देशित अधिकारी कार्यालय येथे ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी कळविले आहे.
00000

0 Comments