लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेला आजही अर्थ, धार आणि विश्वास देणारे मोजकेच लोक उरले आहेत. अशाच निर्भीड, निष्ठावान आणि समाजाभिमुख पत्रकारांपैकी एक नाव म्हणजे आदरणीय यशवंत पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा नव्हे, तर सत्यासाठी झगडणाऱ्या पत्रकाराला दिलेला सलाम आज व्यक्त होत आहे.
पत्रकारिता – व्यवसाय नव्हे, ध्येय
यशवंत पवार यांच्यासाठी पत्रकारिता ही नोकरी किंवा प्रसिद्धीचे साधन कधीच नव्हते; ती समाज परिवर्तनाची हत्यार राहिली आहे. सत्तेच्या दारात नतमस्तक न होता, अन्यायाच्या विरोधात ठाम उभे राहणे, हा त्यांच्या लेखणीचा स्वभाव आहे. त्यांच्या बातम्या केवळ माहिती देत नाहीत, तर प्रश्न निर्माण करतात, व्यवस्था हादरवतात.
सामान्यांचा आवाज, सत्तेला प्रश्न
शेतकरी, कामगार, गरीब, वंचित, अल्पसंख्याक, महिला – समाजातील प्रत्येक घटकाचे दुःख त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. अनेकदा दबाव, धमक्या, अडचणी आल्या; पण सत्याची वाट सोडली नाही. “भीती न बाळगणारी पत्रकारिता” हेच यशवंत पवारांचे खरे ओळखचिन्ह आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
शब्बीर शेख - संपादक हल्लाबोल न्यूज सोलापूर.

0 Comments