*महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 4 जानेवारी रोजी सोलापूर शहरातील 30 उपकेंद्रावर होणार*
सोलापूर दि. 2 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट – ब परीक्षा असल्या कारणाने परिक्षा केंद्राच्या परिसरात दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 08.30 पासून ते दुपारी 13.00 वाजेपर्यंत परीक्षार्थींना कसलाही अडथळा होउ नये. या दृष्टीने परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहय उपद्रव कमी करणे परीक्षार्थीना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पायबंद करणे तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, पॅफेंक्स, इमेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये आणि सर्व संबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे आणि कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे/विशा), सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी कळविले आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
०१ परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही,
०२. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य
करण्यात येणार नाही.
०३. परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फॅक्स, एस.टी.डी.
बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे इत्यादी दळणवळणाची माध्यमे बंद राहतील.
04. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, पेजर सारखा दुरसंचार साधने व इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स
स्मार्ट वॉच, फॅक्स, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून परीक्षार्थीना प्रवेश करण्यास मनाई असेल.
05. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही.
०६. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशांस मनाई राहील.
7. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले मुख्याध्यापक/कर्मचारी, शासकिय कामावरील अधिकारी व कर्मचारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / शिक्षक/कर्मचारी आणि उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (उमेदवारांच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही.
०८. परीक्षा केंद्राचे १०० मीटरचे आवारात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
०९. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परीसरात दि.०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८.३० वा. ते १३.०० वा. या कालावधीत ध्वनीक्षेपके बंद ठेवावीत.
१०. परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबंधित अधिकारी/कर्मचारी आणि परिक्षार्थी सोडून कोणालाही प्रवेश असणार नाही.
*परीक्षा उपकेंद्राची नावे -
परीक्षा सोलापूर शहरातील एकूण ३० उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे -
फौजदार चावडी पोलीस ठाणे परिसरात येणारे परीक्षा केंद्र :- १. श्री. दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज, बाळीवेस, सोलापूर, २. बी.एफ. दमाणी हायस्कुल, १९४/१, बुधवार पेठ, सोलापूर, 3. शरदचंद्र पवार प्रशाला, मुरारजी पेठ सोलापूर, ४. संभाजीराव शिंदे प्रशाला, ९१, मुरारजी पेठ, जुनी मिल कंपाऊन्ड, सोलापूर, ५. छत्रपती शिवाजी प्रशाला, १०१-बी, मुरारजी पेठ, सोलापूर, ६. राज मेमोरीअल इंग्लिश स्कुल, जुनी मिल आवार, मुरारजी पेठ, ७. सिध्देश्वर हायस्कूल, १ सिध्देश्वर पेठ, सोलापूर, ८. सिध्देश्वर कन्या प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. जेल रोड पोलीस ठाणे परिसरात येणारे परीक्षा केंद्र :- ९. सोलापूर सोशल आसोसिएशन्स आर्ट & कॉमर्स कॉलेज, सिध्देश्वर पेठ, सोलापूर, १०. बेगम कमुरुन्नीसा कारीगर गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, १४१/ए सिध्देश्वर पेठ, सोलापूर, ११. ए. आर. बुर्ला सिनिअर वुमेन्स कॉलेज, रविवार पेठ, सोलापूर, १२. कुचन हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, २७२ रविवार पेठ, सोलापूर, १३. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, अशोक चौक, सोलापूर. जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरात येणारे परीक्षा केंद्र :- १४. सोलापूर एज्युकेशन सोसायटीज पॉलीटेक्नीक, बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर, १५. उमाबाई श्रावीका हायस्कुल, १९७ बुधवार पेठ, सोलापूर, १६. S.R. चंडक इंग्लिश हायस्कुल, १९४/१ बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर, १७. सिध्देश्वर चुमेन्स पॉलिटेक्निक, भवानी पेठ, रुपा भवानी रोड, सोलापूर, १८. श्री. सिध्देश्वर बालमंदिर माध्यमिक स्कुल, ९१० भवानी पेठ, सोलापूर, १९. के.एल.ई. अण्णाप्पा काडादी हायस्कुल, भवानी पेठ, सोलापूर, २०. D.B.F. दयानंद कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, भवानी पेठ, सोलापूर, २१. दयानंद काशीनाथ आसावा, हायस्कूल, १०१-बी, भवानी पेठ, सोलापूर. सदर बझार पोलीस ठाणे परिसरात येणारे परीक्षा केंद्र :- २२. मॉडर्न हायस्कुल, गांधी नगर, सोलापूर, २३. हरीभाई देवकरण हायस्कुल, रेल्वे लाईन्स, सोलापूर, २४. हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल १६६, रेल्वे लाईन, सोलापूर, २५. संगमेश्वर कॉलेज, १६५, रेल्वे लाईन, सोलापूर, २६. वसंतराव नाईक हायस्कुल, ९२८, नार्थ सदर बझार, सोलापूर, २७. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, महिला महाविद्यालय मोदिखाना, सोलापूर. विजापूर नाका पोलीस ठाणे परिसरात येणारे परीक्षा केंद्र :- २८. भारती विद्यापीठ हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, विजापूर रोड, सोलापूर, २९. शांती इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यु संतोष नगर, सोलापूर, ३०. जागृती विद्यामंदिर हायस्कुल नेहरूनगर सोलापूर.
हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/अंमलदार, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी / अंमलदार यांचे बाबत त्यांचे परीक्षेसबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्तींनाच भ्रमणध्वनीचा वापर करता येईल. इतर सर्वांना भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असेल.
या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फोजदारी कार्यवाही करण्यात येईल असे आदेश पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे/विशा) पोलीस आयुक्त, सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी काढले आहेत.
00000

0 Comments