सोलापूर दि. 2 (जिमाका) सोलापूर शहरात मकरसंक्राती व त्यानंतरच्या काळात पतंग उडविण्याचा उत्सव साजरा होत असून त्यासाठी नायलॉन प्लास्टिक किंवा सिंथेटीक यापासून बनविलेला मांजा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता पोलिस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार यांनी दिनांक 1 जानेवारी 2026 चे 00.01 वाजलेपासून ते दिनांक 30 जानेवारी 2026 चे 24.00 वाजेपर्यंत मकरसंक्रांती उत्सवा दरम्यान पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मांजा याकरिता नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटीक दोऱ्याचा वापर करुन पतंग उडविण्याकरीता मनाई आदेश लागू केले आहेत.
दरवर्षी मकरसंक्रात उत्सवा दरम्यान पतंग उडविण्यासाठी पक्का दोरा वापरला जातो, जो की प्लास्टिक / सिंथेटीक नॉयलॉन साहित्य वापरुन बनविलेला असतो, ज्यास सर्वसामान्यपणे नायलॉन मांजा म्हणून ओळखतात. सदर नायलॉन मांजामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व पशुपक्षांचे जीविताचे रक्षण करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या करिता पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा दोरा जो की, नायलॉन प्लास्टिक किंवा सिंथेटीक मटेरियलने बनविला जातो, त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
तसेच तुटलेल्या कापलेल्या पंतगाचे धागे हे जमीनीवर पडतात, सदर दोरे हे दिर्घकालीन नाश न पावणारे असून, नायलॉन / प्लास्टिक / सिंथेटीक मटेरियल हे नैसर्गिकरित्या विघटन न होणारे साहित्य आहे. हे निसर्गास व पर्यावरणास देखील घातक आहे. सदर दोरा गटारी, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, नद्या, नाले तुंबण्यासाठी कारणीभुत होतो. तसेच जनावरे हे चारा खाताना चुकून नायलॉनचा मांजा खातात, त्यामुळे प्राण्यांना शारिरिक समस्या निर्माण होतात. दिवसेंदिवस पक्षांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. पतंगाच्या मांजामुळे आकाशात उडणारे पक्षी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मांजामुळे दुचाकी वाहन चालविण-या नागरिकांना देखील गंभीर दुखापत, अपघात होण्याचा संभव असतो. याकरिता नायलॉन प्लास्टिक किंवा सिथेटीक दोन्याचा वापर करुन पतंग उडविण्याकरीता प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
त्यामुळे पोलीस आयुक्त, सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी एम. राज कुमार, यांनी प्रदान केलेल्या अधिकारांन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार दिनांक ०१ जानेवारी २०२६ ते दिनांक ३० जानेवारी २०२६ या ३० दिवसाच्या कालावधीमध्ये पतंग उत्सवादरम्यान पक्का दोरा जो की, नायलॉन मांजा म्हणून ओळखला जातो, जो नायलॉन /प्लास्टिक किंवा सिंथेटीक मटेरियलने बनविला जातो, असा दोरा/गांजा वापरणे, बाळगणे, विकणे व साठा करणे करीता प्रतिबंध करण्यात येत आहे. सदरचा आदेश हा दिनांक ०१ जानेवारी २०२६ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक ३० जानेवारी २०२६ चे २४.०० वा. पर्यंत अंमलात राहिल.
जो कोणी व्यक्ती सदर आदेशाचा भंग करेल तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -२०२३ चे कलम २२३ नुसार प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल असे पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

0 Comments