Advertisement

Main Ad

आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत तालुका मास्टर ट्रेनर्स कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

सोलापूर, दि. १६ (जिमाका) – आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात “आदि कर्मयोगी अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश बहुस्तरीय क्षमता निर्मिती कार्यक्रमाद्वारे प्रतिसादात्मक प्रशासनाची रचना निर्माण करणे आहे. याच अनुषंगाने ११ ते १३ सप्टेंबर २०२५ दरम्यान तालुका मास्टर ट्रेनर्ससाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

ही कार्यशाळा उठता रिसॉर्ट अँड फार्म हाऊस, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन राज्य प्रशिक्षक श्री. नवेंदु फिरके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. धनंजय झाकडे, जिल्हा मास्टर ट्रेनर्स, विभागीय अधिकारी, तसेच प्रशिक्षणार्थी मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते.

* प्रशिक्षणाचे स्वरूप:
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, सांगोला आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व परांडा तालुक्यातील एकूण ६५ गावांमध्ये अभियानाची अंमलबजावणी होणार आहे. कार्यशाळेत सहभागी २० तालुका मास्टर ट्रेनर्सना जिल्हा मास्टर ट्रेनर्सकडून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात खालील बाबींचा समावेश होता:
- गाव बैठकीचे नियोजन व समन्वय  
- गाव विकास आराखडा तयार करणे  
- तक्रार निवारण यंत्रणा व आदि सेवा केंद्र स्थापन  
- सहभागी घटकांची नियुक्ती व गटचर्चा  
- समस्या व अपेक्षांची नोंदणी

* उपक्रम व सत्रे:
कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षकांनी “दृष्टकोनामध्ये बदल”, “आंगण निर्माती”, “फिश बाऊल”, “चौकटीच्या बाहेर विचार”, “मूल्यचक्र”, “भावना”, “चौरस जोडणी”, “मानवी गाठ” यांसारखे सृजनशील उपक्रम राबवले. यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व सहभागीमूलक ठरले.

* अंमलबजावणीची कालमर्यादा:
अभियानाची माहिती गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी २० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. तालुका मास्टर ट्रेनर्सनी संबंधित गावांमध्ये बैठका घेऊन अभियानाची माहिती व विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.

* मार्गदर्शक व सहभागी अधिकारी:
या कार्यशाळेस राज्य प्रशिक्षक नवेंदु फिरके, प्रकल्प अधिकारी धनंजय झाकडे, जिल्हा प्रशिक्षक भागवत आंदळकर, महेश भोरे, कल्याण श्रावस्ती, शिवराज रोठाड, ग्रामपंचायत अधिकारी, तसेच प्रकल्प कार्यालयातील सुधाकर भांगरे व युवराज चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभले.
                *****

Post a Comment

0 Comments