सोलापूर, दि. 16 - जिल्हा लोकशाही दिन सोमवारी दि. 6 ऑक्टोबर, 2025 रोजी होणार आहे. या दिवशी जनतेच्या तक्रारी गा-हाणी ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहणे बाबतचे निर्देश शासन परिपत्रकान्वये प्राप्त आहेत.
या दिवशी आपलेकडील मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाचे निवेदनावर केलेली कारवाईचा अहवालासह हजर रहावे. तसेच आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही इ. माहितीसह सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे उपस्थित रहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या दिवशी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
....

0 Comments