Advertisement

Main Ad

पंढरपुरात यात्रेची तयारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झाली बैठक*




पंढरपूर- आषाढी यात्रेच्या काळात पालखी मार्गावर वैदयकीय पथके, आवश्यक उपकरणे व औषधांसह सुसज्ज ३३२ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आय.सी.यू. कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. यात्रा काळात १३०० ते १५०० आरोग्य कर्मचारी सेवा बजावतील, दिंड्या सोबत पालखी मार्गावर २९० आरोग्यदूत बाईक अॅम्ब्युलन्स व्दारे आरोग्य सेवा देणार आहेत. त्याचबरोबर वारकरी भाविकांना औषधी किट आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात असल्याची माहितीही यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिली.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शुक्रवारी पालखी मार्गाची पाहणी करून आरोग्य विभागाच्या नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे बैठक घेऊन यात्रेचे नियोजन केले. यावेळी आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवार, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, डॉ. राधाकिशन पवार आदी उपस्थित होते.
वाखरी येथील पालखी तळाची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाखरी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घघेवून आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत संचालक डॉ. विजय कंदेवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके उपस्थित होते.
रुग्णालयांना जनआरोग्य योजनेंतर्गत १० टक्के खाटा रिक्त ठेवण्याचे आदेश, योजनांची प्रसिद्धी - या वेळी आबिटकर म्हणाले, पंढरपूर शहर त्याचबरोबर पालखी मार्गावरील खाजगी दवाखान्यात महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत असणा-या रुग्णालयांना १० टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार असून, ट्रॉमा आयसीयू सेंटरच्या ठिकाणी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन
देण्यात येणार आहे. राज्यभरापासून वारकरी भाविक येतात यासाठी आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, सुविधा आदीबाबतचा प्रचार-प्रसिध्दी करण्यात यावी. जेणेकरुन आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल, असेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments