सोलापूर : शनिवारी आकाश दिवसभर निरभ्र होते. पावसानेही विश्रांती घेतली. दरम्यान, भारतीय हवामान शाळेने रविवारसाठी ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यानुसार पाऊस येण्याची शक्यता कमी आहे. तसेच सोमवारसाठी मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
सोलापूर शहराचे तापमान शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ०.७अंशाने वाढून ते ३३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मे महिन्यातील पावसामुळे शहराचे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली होती. वाऱ्याचा वेग वाढून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने जून महिन्यात अपेक्षीत पाऊस सध्या तरी झालेला नाही. १५ जूननंतर मात्र दमदार पाऊस येईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात रविवारी हवामान शाळेने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर मात्र उद्या आणि परवा मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

0 Comments