सोलापूर दि. 13 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर या कार्यालयात 6 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने अर्धवेळ 11 महिन्यासाठी सफाईगार पदाची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार संस्थांकडून विनानिवीदा मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहे.
• काम देणाऱ्या कार्यालयाचे नाव :- मा. सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र सोलापूर
• आवश्यक पदाचे नाव :- अर्धवेळ सफाईगार
• पदाची संख्या :- 1
• कुशल / अकुशल :- अकुशल
तरी जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या तसेच उपरोक्त पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्र दिनांक 21 एप्रिल 2026 पर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करावे असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थकोट, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक. 0217 – 2992956 द्वारे संपर्क करावा.
00000

0 Comments