सोलापूर, दिनांक 13 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते 15 मे 2026 या कालावधीकरिताची रुपरेषा निश्चित करुन देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगांव व वडाळा मंडळ स्तरावर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समाधान शिबिराचे आयोजन करणेत आले आहे.
तसेच या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी, मा. अपर जिल्हाधिकारी, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर मा. आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. असे तहसिलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

0 Comments