सोलापूर दि. 4 (जिमाका):- सोलापूर जिल्हयातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांना कळविण्यात येते की, माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या ६५ वर्षा वयावरील माजी सैनिक/विधवा पत्नी यांच्या माहितीचा तपशील दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सकाळी १०.०० ते ०६.०० पर्यंत समक्ष येऊन कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
अटी व शर्ती
१. सैन्य सेवा केलेले परंतु माजी सैनिक व्याख्येत न बसणारे ६५ वर्षावरील व्यक्ती. (विधवा साठी वयाची अट नाही)
२. सैन्यसेवेतून बडतर्फ म्हणजे Dismiss झालेल्या माजी सैनिकांनी अर्ज करु नये.
३. KSB/ZSB कड़न चरित्रार्थासाठी आर्थिक मदत मिळण्यास पात्र नसलेल्यानी अर्ज करावा.
४. अर्ध सैनिक बल म्हणजे Paramilitary Force मधील नसावा.
५. Territorial Army म्हणजे TA मध्ये सेवा केलेले अर्ज करु शकतात.
६. चरितार्थासाठी उत्पन्नाचे काहीही साधन नसलेल्या व्यक्तीनीच माहिती द्यावी.
*****

0 Comments