सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र परिवार वतीने इतर ठिकाणाहून सोलापूर शहर जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करणे सन्मान करणे. पोलीस अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीच्या बातम्या लावणे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्या साठी प्रयत्न करणे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शासन दरबारात प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निवेदन पत्रव्यवहार करणे पोलिसांच्या सुट्ट्या रजा त्याच बरोबर पोलीस अधिकारी /कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करणे शुभेच्छा देणे चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा सत्कार करणे यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी /कर्मचारी यांच्या समस्या अडचणी राज्य सरकारकडे मांडून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे पोलिसांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा होऊन पोलीस मित्र परिवार सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी रमेश दग्गारी यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचा पोलीस मित्र परिवार सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे अमोल कुलकर्णी राजाभाऊ पवार उपस्थित होते.
रमेश दग्गारी हे अतिशय शांत संयमी व मनमिळाऊ असून सर्वाना सोबत घेऊन काम करणारे अशी त्यांची ओळख असून पोलीस मित्र परिवार च्या सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे

0 Comments