सोलापूर, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका): सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूरमार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. २ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) राबविण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/Qaxh23CEBJG7083Q7 तसेच QR कोड उपलब्ध असून, सदर लिंक दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या संकेतस्थळावर (www.zpsolapur) उपलब्ध आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपाध्यक्ष, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर, संदीप कोहिणकर, तसेच जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. व्ही. डी. येवले यांनी संयुक्तपणे केले आहे.
*******

0 Comments