Advertisement

Main Ad

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थीच्या अर्थसहाय्य रक्कमेत वाढ



•वाढीव अर्थसहाय्याचा लाभ न मिळालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

सोलापूर, दिनांक 4 (जिमाका):- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य दरमहा 1 हजार 500 रुपये वरुन 2 हजार 500 करणेत आले आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदौरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना यापूर्वी 1500 रु.अनुदान दिले जात असे. परंतु शासन निर्णयान्वये माहे ऑक्टोंबर 2025 पासून डीबीटीव्दारे 2500 रु. अनुदान वितरीत केले जात असल्याचे संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
  परिपत्रका नमूद केले आहे की, जे लाभार्थी दिव्यांग आहेत परंतु त्यांना माहे ऑक्टोंबर 2025 पासून 2 हजार 500 अनुदान प्राप्त न होता केवळ 1 हजार 500 रु. अनुदान प्राप्त झाले आहे अशा लाभार्थ्यांनी तसेच सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे :-
1) दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्डची छायांकित प्रत
2) आधारकार्ड छायांकित प्रत
3) बँकेचे पासबुकचे छायांकित प्रत
4) मोबाईल नंबर (मोबाईल नंबर व आधारकार्ड ज्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल त्या बँक खात्यात सदर अनुदान जमा होणार आहे.)
5) शिधापत्रिका छायांकित प्रत
  संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी यांचेकडे तात्काळ जमा करावेत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी वाढीव अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी.
  विशेष सहाय्य योजनेचे दिव्यांग लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तहसिल कार्यालयाचे संजय गांधी शाखा अथवा संबंधित गावच्या तलाठ्याकडे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात आले आहे.

0000

Post a Comment

0 Comments