सोलापूर, दिनांक 4 : - जिल्हयातील व शेजारील जिल्ह्यातील बॉम्बे इंजिनियर ग्रुप. (खडकी) पुणे मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक व वीर नारी/वीर माता-पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंवित, इतर रेजिमेंटमधून आणि भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेनेमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे मेळावा संपन्न झाला आहे.
या मेळाव्यासाठी लेफ्टनंट जनरल एस एस हसबनिस, पी व्ही एस एम, बी एस एम, ए डी सी (सेवानिवृत), हॉनररी सेक्रेटरी ऑफ बॉम्बे संपर्स आसोसिएशन यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये व ब्रिगेडियर एस आर मजगांवकर (सेवानिवृत्त), बॉम्बे सैपर्स आसोसिएशन, कर्नल मुलचंद गुर्जर, कर्नल रेकार्डस, बॉम्बे इंजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे, ले. कर्नल प्रकाश पाटील, चौफ रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे, मेजर मोरे डि एच रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे, कर्नल सतिश रनधिर, कमान अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एन सी सी, सोलापूर, मेजर विपुल पाटील, आर्मी मेडिकोल कोर, मेजर हसिता मनस्वी, मिलिटरी डेंटल सेंटर खडकी (पूर्व), मेजर मिलिंद देवदत्त तुगार, (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर, ०३ जेसीओ व २३ सेवारत अन्य रँकमधील जवान यांचेसह सोलापूर व शेजारील जिल्हयातील एकुण २६८ माजी सैनिक, वीर पत्नी वीर माता-पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व त्यांचे अवलंबित उपस्थित होते.
माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचा उद्देश पेन्शनधारकांना त्यांच्या कागदपत्राशी संबंधित तक्रारी आणि संरक्षण पेन्शनच्या वाटपाबाबत अभिलेख कार्यालय बॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे द्वारे PCDA(P) मधील मंजूरी प्रधिकरण, अभिलेख कार्यालय, पुणे व पेन्शन वितरण प्राधिकरण बँका या एजन्सीच्या प्रतिनिधी समोर सोडविणे असल्याने माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमामध्ये पेन्शनशी संबंधित मुद्दे, जवळच्या नातेवाईकांचे दस्ताऐवजीकरण, स्पर्शसी संबंधित मुद्दे, ECHS कार्डशी संबंधित समस्या, पेन्शन वितरण आणि बॅकिंगशी संबंधित समस्या, आधार कार्डशी संबंधित समस्या, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि डीपीडीओ यांच्याशी संवाद वैद्यकिय दंत शिबिर इत्यादी बाबीवरती सविस्तर चर्चा करुन संबंधिताच्या अडी-अडचणी सोडविण्यात आल्या आहेत.
मेळाव्यामध्ये लेफ्टनंट जनरल एस एस हसबनिस, पी व्ही एस एम, वी एस एम. ए डी सी (सेवानिवृत), हॉनररी सेक्रेटरी ऑफ बॉम्बे संपर्स आसोसिएशन, ब्रिगेडियर एस आर मनगांवकर (सेवानिवृत्त), बॉम्बे संपर्स आसोसिएशन, कर्नल मुलचंद गुर्जर, कर्नल रेकार्डस, बॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे, कर्नल सतिश रनधिर, कमान अधिकारी, ९ महाराष्ट बटालियन एन सी सी, सोलापूर व मेजर मिलिंद देवदत्त तुगार, (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी उपस्थित माजी सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन करुन आपले मनोगत व्यक्त केले.
कर्नल प्रकाश पाटील, चीफ रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे यांनी सदर मेळाव्यासाठी सुत्र संचलन करुन कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.
सदर मेळाव्यामध्ये अभिलेख कार्यालय चॉम्बे इजिनियर ग्रुप, (खडकी) पुणे यांचेमार्फत उपस्थित एकुण वीस माजी सैनिकांच्या पत्नीचे नांव पुर्ण करुन देण्याची कार्यवाही जागेवरच करुन दिली व संबंधितांस त्याची प्रत सुपूर्त करण्यात आली. सदर मेळाव्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथील कर्मचारी वृंदांनी बहुमोल योगदान दिले. माजी सैनिकांनी जास्तीत जास्त सदर मेळाव्याचा फायदा घेण्यासाठी माजी सैनिकांची उपस्थितीबाबत सोलापूर जिल्हयातील एकुण अकरा तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर मेळाव्यामध्ये बँकेशी निगडीत बाबींचे निराकरण करणेसाठी स्टेट बैंक ऑफ इंडिया, ट्रेझरी शाखा सोलापूर व बँक ऑफ महाराष्ट्र कॅम्प शाखा सोलापूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

0 Comments