Advertisement

Main Ad

सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे तात्पुरत्या स्वरूपात पहारेकरी पदासाठी भरती



सोलापूर, दि. १७ (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर पहारेकरी (१ पद) भरावयाचे आहे. सदर पदासाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार असून मानधन रुपये २०,८८६/- प्रतिमहा निश्चित करण्यात आले आहे.

हे पद निवासी स्वरूपाचे असून नियुक्त उमेदवाराने रात्रीचा पहारा देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे. पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. मुलाखती दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार असून उमेदवारांनी स्वतःची मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.

माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील पात्र उमेदवारांचा विचार केला जाईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments