Advertisement

Main Ad

सोलापूर विद्यापीठाचे कायदा अधिकारी खैरदी 'गुणीजन गौरव' पुरस्काराने सन्मानित!





सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खरेदी यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गुणीजन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजयराजे भोसले, अमोलराजे भोसले आदी उपस्थित होते. ऍड. खरेदी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र- कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments