Advertisement

Main Ad

माता प्रतिष्ठानच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यशस्वीपणे संपन्न; पाच जोडप्यांचे विवाह*


सोलापूर : थोबडे वस्ती येथील माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा प्रथमच सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर देगाव नाका, थोबडे वस्ती येथे पार पडलेल्या या सोहळ्यात पाच जोडप्यांनी शुभमंगल परिणय सूत्रात बांधले गेले.

विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगल वातावरणात पार पडला. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे, माजी नगरसेवक गणेश वानकर, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, लक्ष्मण मामा जाधव, लहू गायकवाड, युवा उद्योजक सुमित पाटील, अक्षय वाकसे, प्रशांत बाबर, माजी नगरसेविका सुनीता रोटे, छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे, जितू वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

माता प्रतिष्ठानच्यावतीने वधूंना मणीमंगळसूत्र, शालू तर वरांसाठी सफारी ड्रेस तसेच संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली. वधू-वरांच्या नातेवाईकांसाठी मिष्ठान्न भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती. याचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

विवाहानंतर नवविवाहित जोडप्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँडपथक, फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता. उपस्थित मान्यवरांनी माता प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत नवविवाहितांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी माता प्रतिष्ठान सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार, उत्सव अध्यक्ष अजय सरवळे, ज्येष्ठ नागरिक अरुण महाराज आवताडे यांच्यासह भाऊ मस्के, तानाजी जाधव, संजय मस्के, दत्ता गुंड, उमेश मुदलियार, प्रमोद अवताडे, गणेश भुसे, सचिन पुकाळे, सोमनाथ मस्के, नागेश मस्के, निलेश नलावडे, शंभूराज गायकवाड, पद्मिनी शेट्टियार, शोभा क्षीरसागर, संगीता सरवळे, मनीषा पारवे, कविता म्हस्के, सुजाता नागणे, रेखा मस्के, विश्वनाथ जाधव, नवनाथ मस्के, पंकज लांबतूर, आतिष कांबळे, प्रदीप हुंचीकट्टी, योगेश मस्के, रोहन मराठे, सुमित वाघमारे, अरुण जाधव, सुर्या शेट्टीयार, शुभम जाधव, संभाजी जाधव, गोविंद नागणे, योगेश सरवळे, हरी जाधव, निखिल लांबतूरे, सचिन नरळे, समर्थ डोंगरे, गणेश नागणे, चेतन घुले, यश कांबळे आदींनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments