सोलापूर- दि. २ जून २०२५:
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची बिनधास्त विक्री सुरू असून, त्यामुळे विद्यार्थी व्यसनाधीन होण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अनोख्या पद्धतीने निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.मनसे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन देताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश व सिगारेट पाकिटांची पुढ्याची माळ तयार केली स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिले.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा मनविसेच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी ,जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, रोजगार व स्वयंरोजगार चे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, मनविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे, संतोष बारटक्के ,समर्थ माळगे ,अभिषेक इरकल ,सैपन जमखंडी, सुनील जगले,वैभव रंपुरे, आकाश देशमुख व मनसैनिक उपस्थित होते.

0 Comments