Advertisement

Main Ad

गोंडस बाळाचा अपघाती मृत्यू: बेजबाबदार दुचाकीस्वार आणि उशिरा उपचारामुळे दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप..!*


सोलापूर (प्रतिनिधी):
शहरातील अशोक चौक परिसरातील केवळ सहा वर्षांचा गोंडस मुलगा शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोध्दूल याचा ३१ मे रोजी दुपारी एका दुचाकीच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. ही घटना गेंट्याल चौक, शास्त्री नगर येथील सरस बार समोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४ च्या सुमारास शिवांशू आपल्या आजीसोबत रस्त्यावरून चालत असताना दोन मुली दुचाकीवरून अतिवेगात येत होत्या. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्यांनी शिवांशूला जोरात धडक दिली. या धडकेत मुलाच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तात्काळ नागरिकांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
परिवाराने आणि सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोध्दूल यांनी आरोप केला आहे की, दुचाकीस्वार मुलींचा निष्काळजीपणा आणि डॉक्टरांकडून उपचारात झालेला उशीर यामुळेच या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या लहानग्याचा मृत्यू केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments