सोलापुर दि. 20( जिमाका):- दिनांक 23 जून 1894 साली आंतर राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली या दिवशी आंतर राष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या दृष्टीने, प्रोत्साहन देण्यासाठी व प्रवृत्त करण्यासाठी जागतिक ऑलिपिक डे साजरा केला जातो.
या अनुषगांने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने दि.23 जून 2025 रोजी सकाळी 07.30 वा. जिल्हयातील खेळाडूंचा व छत्रपती पुरस्कार विजेत्याचा सत्कार व क्रीडा विषयक आयोजन जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रमांस खेळाडूं, पुरस्कार्थी व क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. तसेच जिल्हयातील प्रत्येक शाळा, महाविदयालये, विविध खेळाचे संघटना, एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औदयगिक प्रतिष्ठाणे यामध्ये सदर ऑलिम्पिक दिन उपक्रमांचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, फोटो, जिल्हा क्रिडा कार्यालयास सादर करण्यात यावा. अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे.
0000000

0 Comments