Advertisement

Main Ad

प्राप्तिकर विभागात नोकरी लावतो म्हूणन सात लाखांची फसवणूक*



सोलापूर : प्राप्तिकर विभागात लिपिकची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश नाना सुळे (वय ५५, रा. सिद्धाचीवाडी, ता.
माळशिरस), निलेश राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शिवानंद मल्लिकार्जुन हिप्परगे (वय ५५, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक एप्रिल २०२४ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत फिर्यादीचा मुलगा मल्लिकार्जुन यास प्राप्तिकर विभागात लिपिक पदाची नोकरी
लावून देतो असे म्हणून लिपिक पदासाठीच्या असणाऱ्या बनावट व खोटे सही शिक्क्याचे कागदपत्र दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून रोख सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments