Advertisement

Main Ad

सराईत गुन्हेगार विनायक नारबंडी एमपीडीए अन्वये स्थानबद्ध*


सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी (वय ३१, रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) याच्यावर एमपीडीए अन्वये स्थानबद्धची कारवाई करून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नारबंडी हा गेल्या काही वर्षांपासून घातक शस्त्राने दुखापत करणे, मोबाइल चोरी, घरफोडी, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत होता. त्याच्याविरुद्ध अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. नारबंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२३ मध्ये एमपीडीए अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली होती. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त राज कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले. या आदेशाची अंमलबजावणी करीत पोलिसांनी नारबंडी यास पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments