सोलापूर: प्रभाग क्रमांक पाचमधील बाळे राजेश्वरी नगर येथील खड्डेमय रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन अखेर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादाला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या वर्षभरात अनेक नेत्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. कोणी डांबर टाकले, कोणी डस्ट तर कोणी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, नागरिकांच्या मते, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून आणि राजाभाऊ आलोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हा रस्ता आता सिमेंट-काँक्रीटचा होणार असून, यामुळे रस्त्याचे भाग्यच उजळले आहे.
या उद्घाटन प्रसंगी राजाभाऊ आलोरे, आनंद भवर, विनय ढेपे, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, सुहास माने, रामेश्वर झाडे, ननवरे सर, अमोल झाडगे, नंदकुमार बटाने, दीपक सुरवसे यांच्यासह राजेश्वरी नगर येथील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या काँक्रिटीकरणामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

0 Comments