Advertisement

Main Ad

तब्बल 11 तासांच्या प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश!*


अक्कलकोट / सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या #शिवसेना मेळाव्यात माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत करून या भागाचा विकासासाठी नक्की आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

या सभेसाठी तब्बल ११ तास अक्कलकोट येथील स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्षा करत ते थांबून राहिले.

सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे हे या परिसरातील एक मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात,धर्म, पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांची प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत, त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनिष काळजे, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि अक्कलकोट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments