देहूरोड- श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी रिक्षा चालकांच्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष शैक्षणिक मदत म्हणून देहूरोड येथील रिक्षा चालकांना पाच हजार रुपयांचा धनादेश आज रविवार (दि.१८ मे) रोजी वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत श्रीमती नारायण देवी चॅरीटेबल ट्रस्टने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रिक्षा चालकांच्या कुटुंबांना आधार देण्याचा संकल्प केला आहे.
या योजनेअंतर्गत,रिक्षा चालकांच्या मुलींना शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक शुल्काची मदत प्रदान करण्यात आली आहे. ट्रस्टच्या या उपक्रमाचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला चालना देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाठबळ देण्यासाठी आहे.असे
ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर किसनलाल अगरवाल म्हणाले , "रिक्षा चालक समाजाचा महत्त्वाचा हिस्सा आहेत, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलींचे शिक्षण अनेकदा खंडित होते. आमचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या मुलींना शिक्षणाची संधी देण्यासाठी आहे."
देहूरोड येथील रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेच्या रिक्षा चालकांना प्रमुख मान्यवर पत्रकार अंनिस शेख, पत्रकार रजाक शेख, विजय पवार,यांच्या उपस्थितीत रफिक शेख,राजू सिंग, सलिम सय्यद, विजय जाधव, दयानंद गायकवाड,विजय माळगी, तुकाराम बागल, युसुफ शेख,किरण वाल्मिकी, यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
शैक्षणिक मदत केल्याबद्दल लाभार्थी रिक्षा चालकांनी श्रीमती नारायण देवी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर किसनलाल अगरवाल यांचे आभार मानले.
हा उपक्रम स्थानिक समुदयातून कौतुकास पात्र ठरला असून,अनेकांनी ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचे स्वागत केले आहे.

0 Comments