Advertisement

Main Ad

ब्रिलियंट ग्रुपच्या वतीने बुध्दपौर्णिमा व महाराष्ट्र कामगार दिना निमित्त १९ गुणवान व्यक्तींना वृक्ष देवून पुरस्कार प्रदान

सोलापूर(प्रतिनिधी ) ब्रिलियंट ग्रुप दिनाचे औचित्य साधून बुध्दपौर्णिमा व महाराष्ट्र कामगार दिना निमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील गुणवान व आदर्श १९ व्यक्तींना वृक्ष देवून पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा इंडियन मेडिकल असोसिएशनचे सभागृह येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ बसवराज कोलूर यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, सोलापूर यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी रवी कटकधोंड, निरुद्दीन मुल्ला तेजश्री माळी, नंदकिशोर कटकोंड, कल्पना शिंदे, या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होते.

या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सोलापूर शहरामध्ये वाढता उन्हाळा पाहून प्रत्येकांनी आपल्या घरासमोर दोन झाडे लावावी म्हणून प्रत्येक मान्यवरांना झाडे देण्यात आली पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कला, क्रिडा, सांस्कृतिक, राजकीय, पत्रकार, ब्यूटी पार्लर, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षी शिक्षण, आरोग्य, कायदा आणि अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष योगदान दिलेल्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कवी जावेद शेख भूमी ताया वरगंटी, डॉ. नूर अहमद कारंजे मोहम्मद अजीम डांगे. शिवपुत्रा कलशेट्टी, इरफान मंगगिरी, मल्लिनाथ रुपनूर. रतनकुमार खरबस, अनिता कोडमुरे, नयना थोरात (हरिहर). सौ. कावेरी कल्याणशेट्टी, शर्वरी कटकोंड, सौ. वैशाली उबाळे, विवेक डोलारे सलीम शेख आकाश जोगी. सौ. संजिवनी सिधगणे, तेजश्री माळी, सिबगतुल्लाह शेख यांचा समावेश होता

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रिलियंट ग्रुपच्या अध्यक्ष इम्तीयाज अक्कलकोटकर, उपाध्यक्ष कु. प्रणाली रासे या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सिद्धांत वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन मल्लिकार्जुन हेगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.ए. शेख, एजाज शेख, दिपक मठ जी एम नदाफ, अॅड. विश्वास जाधव, अॅड पंकज कांबळे, शफी शेख, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल रहिमबक्ष बागवान (बिलाल), सुनिल रोडगे, नागेश कोळी, रशिद पठाण, संतोष जत्ती, सुनील संजय कोडल मेजर सुरेश लोखंडे, एजाज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments