Advertisement

Main Ad

कामती येथील अल्लाउ‌द्दीन बाबा यांचा उरुस दिनांक १५ व १६ मे रोजी

कामती बु. ता.मोहोळ येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पिर अल्लाउ‌द्दीन बाबा यांचा उरुस दिनांक १५ व १६ मे रोजी संपन्न होणार आहे. दरवर्षी बौध्द पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवारी आणि शुक्रवारी आयोजित करण्यात येतो.पिर अल्लाउ‌द्दीन बाबा हे हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक १५ मे रोजी गावातून संदल मिरवणूक आणि दिनांक १६ मे रोजी कामती गावची यात्रा आणि दिनांक १८ मे रोजी कुस्ती स्पर्धा (देशमुख प्रशाला कामती बुद्रुक येथील मैदानावर) असा कार्यक्रम असल्याबाबतची माहिती पिर अल्लाउ‌द्दीन बाबा यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर आणि सचिव समीर मुजावर यांनी दिली आहे.

सदर उरुस यात्रेमध्ये कामती व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. अल्लाउ‌द्दीन बाबा यात्रेस खूप मोठी परंपरा असून संदल मिरवणूकीमध्ये सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दिनांक १५ व १६ मे रोजी आयोजित उरुसामध्ये सहभागी होण्याचे अवाहन अल्लाउ‌द्दीन बाबा यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर आणि सचिव समीर मुजावर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments