Advertisement

Main Ad

सीमावर्ती भागातील गंगेवाडीच्या सिमरन शेख या विद्यार्थीनीस एसएससीत 97.80 टक्के गुण

सोलापूर : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गंगेवाडी येथील सिमरन जावेद शेख या विद्यार्थीनीनं 97.80 टक्के गुण प्राप्त करीत उज्ज्वल यश मिळवलं. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनं शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी (प्रथम भाषा) विषयात 96 गुण, मराठी (द्वितीय/तृतिय भाषा) 90 गुण, हिंदी (द्वितीय/तृतिय भाषा) 95 गुण, बिजगणित 92 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान 97 गुण आणि सामाजिक शास्त्रे 99 गुण प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला.

सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक अनुसे, शिक्षक रोहित सर आणि रोकडे यांचं सिमरन मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments