Advertisement

Main Ad

शंभूराजे युवा संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळानिमित्त उपक्रम



सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शंभूराजे युवा संघटनेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शंभुराजे छावा मध्यवर्ती मंडळातर्फे साजरा होत आहे. शंभुराजे युवा संघटनेतर्फे गेल्या 17 वर्षापासून मिरवणुकीसाठी खर्च न करता सामाजिक कार्यासाठी खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श पाळला जात आहे. बुधवारी दि. 14 मे रोजी संघटनेतर्फे विविध क्षेत्रात कार्यात डॉ. प्रीती कोनी (वैद्यकीय), अश्विन संगवे (सामाजिक), विकास चाटी (पत्रकारिता), लक्ष्मण पाटील ( वकील) व शिवभक्त अनिल कवडे यांचा सत्कार करण्यात आला. सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चव्हाण, शिवपुत्र मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष राम जाधव, विजय पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आली. प्रास्ताविकात नितीन चव्हाण यांनी संघटनेच्या कार्याची व सत्कार समारंभाबाबत भूमिका विषद केली. सत्कारमूर्ती डॉ. प्रीती कोनी यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या बलिदानाची आठवण देत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अश्विन संगवे यांनी या पुरस्कारामुळे आमचा हुरूप वाढला असून आगामी काळात अधिक सामाजिक कार्य करण्याचे अभिवचन दिले. विकास चाटी यांनी शंभूराजे युवा संघटना तरुणांना चांगल्या मार्गावर नेत असून मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. 

सूत्रसंचालन निकिता दनके यांनी केले. कार्यक्रमास उत्सव समिती अध्यक्ष अशितोष इंगवले, उपाध्यक्ष प्रताप खंदारे, खजिनदार ऋषिकेश सुरवसकर, सोशल मीडिया प्रमुख नितेश माने, विजय चव्हाण, एल. डी. चव्हाण, राज पंचारिया, संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार, उपाध्यक्ष अभिजीत पवार, शैलेश विन्नू, साहिल घाडगे, गौरव घाडगे, आलोक भोसले, बलभीम डोके, एस.के.चव्हाण, अनुसे, दत्तात्रय सुरवासकर, राम ढाले अभय पांढरे, निकीता चव्हाण, सुनिल स्वामी, गायत्री चराटे, स्मिता चराटे, नताशा चव्हाण , रिद्धी चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments