Advertisement

Main Ad

आरोग्य निरीक्षक निलंबित, मनपाचे अकराजण बडतर्फ


*आयुक्तांच्या भाषणात अडथळा आणल्याबद्दल आरोग्य अधिकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती*

सोलापूर : महापालिका आयुक्तांच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल एका आरोग्य निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. बिगारी कामगारांपैकी अकराजणांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शुक्रवारी दिले.

महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे यासाठी छोट्या विविध संघटनांची आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्र दिनी एक मे रोजी पालिकेत मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आयुक्तांच्या भाषणावेळी घोषणाबाजी आणि गोंधळ करून अडथळा आणल्याबद्दल आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसाट यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीचा समाधानकारक खुलासा न केल्याबद्दल शिरसाट यांना निलंबित करण्यात आले आहे. अकरा बिगारी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसारच ही कार्यवाही झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments