सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून आपल्याला पत्रकारिता च्या माध्यमातून शहर जिल्ह्यातील प्रश्न प्रशासन दरबारात मांडून सर्वसामान्य माणसांच्या न्यायहक्कासाठी लढा देत आहेत युवा पत्रकार अंबादास गज्जम यांनी यापूर्वी अनेक वृत्तपत्रामध्ये काम केलं असून त्यांनी
AG न्यूज नेटवर्क नावाने पोर्टल सुरु केलं असून पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते A G न्यूज पोर्टल चे थाटात अनावरण सोलापूर येथे करण्यात आले. नव्याने सुरु करण्यात आलेल्या A G न्यूज नेटवर्क च्या अनावरण प्रसंगी संपादक अंबादास गज्जम यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच A G न्यूज नेटवर्क च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख धाराशिव जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग ) सारिका चुंगे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद हल्लाबोल न्यूज चे संपादक शब्बीर शेख अजहर शेख सतीश गडकरी कबीर तांडूरे संभाजी गोसावी इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Comments