सोलापूर-जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करतात आणि एकाच टेबलवर सलग तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जो काम करीत आहे, अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या २१ मे रोजीपासून करण्यात येत आहेत. काही ठराविक कर्मचाऱ्यांची मोनोपॉली वाढत असून हे बदलण्यासाठी सीईओ कुलदीप जंगम यांनी विभागनिहाय बदली व टेबल बदलीचा नुकताच आदेश काढला होता. त्या आदेशाच्या निर्णयामुळे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. मुख्यालयासह दक्षिण सोलापूर, शिक्षण विभाग- आरोग्य विभाग, बांधकाम एक व दोनचा समावेश आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची आता उचलबांगडी होणार हे निश्चित झाले आहे.

0 Comments