Advertisement

Main Ad

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत...संत शिरोमणी सावता महाराज चंदन उटी उत्सव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न



सोलापूर, दि. १४ (जि. मा. का.) – संत शिरोमणी सावता महाराज चंदन उटी उत्सव व पुरस्कार वितरण सोहळा अरण (ता. माढा) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण व वृक्षारोपण नामदार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.  

उत्सवानिमित्त सावता महाराजांच्या समाधीला चंदनउटी लेप पूजा करून पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘कर्मभूषण’ प्रथम पुरस्कार ह.भ. प. ज्ञानेश्वर कदम माऊली महाराज यांना तर द्वितीय पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर विभाग सुनील फुलारी यांना प्रदान करण्यात आला.  

या प्रसंगी पालकमंत्री गोरे यांनी अरण येथील संजीवन समाधीचा ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करण्याचा मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला असून, पहिल्या टप्प्यात ८९ कोटी निधीस मान्यता मिळाल्याचे सांगितले. लवकरच भूसंपादनाचे काम पूर्ण होऊन येत्या २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.  

पालकमंत्री गोरे म्हणाले की, सावता महाराजांनी आपल्या कर्मातूनच पांडुरंगाची भक्ती करून समाजात समानतेचा संदेश दिला. संतांचे विचार हेच आपले स्फूर्तीस्थान असून, या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही. पंढरपूर कॉरिडॉर, मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारक व अरण येथील तीर्थक्षेत्राचा विकास प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल.  

या सोहळ्यास उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर व वसेकर परिवार, प्रभू महाराज माळी, कल्याण काका, नूतन सभापती अमृता वाघे तसेच गावकरी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
              *******

Post a Comment

0 Comments