अभ्यासक,समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, घटनाकार, लेखक,संपादक, पत्रकार,आणि बहुजणाचे उद्धारकर्ते, आणि शेवटी अतिसंवेदनशील मनाचा बाबा, बाप माणुस अशा किती तरी शब्दाची मालिकाच तोकडी पडावी असा कर्मदाता बाबा म्हणजे भारतीय घटणेचे शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड कष्ट,आणि नियतीला कित्येक वेळा पराभुत करून शोषिताचा केलेला उद्धार हे केवळ एक कार्य नव्हते, तर जन्मदात्या बापापेक्षा कित्येक पटीने केलेले ते अगणीक उपकार होते ज्याची परतफेड करणेच शक्य नाही, माये सोबत कर्तव्याचा पाझर किती खोलवर असावा हे सांगणारा समतेचा सागर म्हणजे माझा भीमबाबा होता.
जगाच्या पाठीवर विस्तारवादाची, अनेक महायुध्ये लढली गेली, न्यायासाठी रक्ताचे पाठ वाहिले,पण बाबा ने कोणत्याहि शस्त्राला स्पर्श न करता राक्षशी मनुवादी शञुचा केलेला पराभव न भुतो न भविष्यती असाच आहे. या देशातील 33 कोटी देवताना देखील शस्त्राशिवाय आणि एकमेका विरूद्ध कुरघोडी शिवाय काहीच करता आले नाही, पण बाबा नी इथल्या माणसाला, स्त्रीला माणसाचे आयुष्य दिले, आणि अनंत उपकाराचे, जन्मो जन्मीचे बापाचे कर्तव्य पार पाडुन बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जगणे दिले हे उपकार.महासागरा ऐवढे अथांग आहेत, हिमालया ऐवढे विराट आहेत, आणि स्वर्गापेक्षा वास्तविक आहेत, ते देण्यासाठी काहिही न मागणारा, आयुष्यभर संघर्ष करणारा आपला बाबा आहे, या देशाचा उद्धार करवीता आपला भीमराव बाबा!! कोटी, कोटी प्रणाम!!👏👏
समाजसेवक डॉ श्री काकासाहेब बाबुराव राठोड महाराष्ट्र राज्य
---------------------------------------

0 Comments