सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास १६ लाख असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या ळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातून निघतात. त्याच बरोबर राजकीय सभा मेळावे बैठका तसेच मंत्री मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही. यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणीचे निवारण होण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी अश्या घटनेला वेळीच पायबंध घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास २३ पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या पण सध्या त्यातील बहुतेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत यापूर्वी पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस चौकीत जायचे. आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल ११२ वर कॉल करावे जागत आहे सोलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्या सोलापूर शहर झपाटाने वाढले असून नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन ला जाणं खूप लांब पडत आहे अनेक नगरवस्त्यापासून पोलीस स्टेशनचे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपली तक्रार फिर्याद नोंदवण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे त्याच व
बरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरु करणे बाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम कार्याध्यक्ष रशीद शेख उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर आन्सर तांबोळी (बी एस ) कलीम शेख अमोल कुलकर्णी सिद्धाराम हमाले उपस्थित होते.

0 Comments