सोलापूर दि. 6 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि सोलापूर टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन, एम.आय.डी.सी. अक्कलकोट रोड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा मंगळवार, दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत "महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर" येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, प्रिन्सिपल, लिपिक, प्रिंटिंग प्रेस, लूम ऑपरेटर, लाईन मॅनेजर/मार्केटिंग मॅनेजर, हेल्पर मशीन ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, लॅब इनचार्ज अशा प्रकारच्या एकूण 142 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार असून 18 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचना दिली आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2992956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी.
******

0 Comments