Advertisement

Main Ad

युवा पत्रकार सादिक शेख यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने वाढदिवस साजरा


सोलापूर (प्रतिनिधी ) मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा साप्ताहिक यश संघर्ष संपादक सादिक शेख यांचा वाढदिवसा निमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे जेष्ठ पत्रकार विष्णू महाराज कारमपुरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच सादिक शेख यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या 
सादिक शेख यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक विषयावर आंदोलन उपोषण करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून समाजातील वंचित पीडित घटकासाठी ते नेहमीच प्रयत्न करत आहे अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मदतीला धावून जाऊन प्रशासन दरबारात त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे अश्या संघर्षवादी चळवळ करणारे युवा पत्रकार सादिक शेख यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने जंगी सत्कार करण्यात आला
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड जिल्हा सचिव अंबादास गज्जम धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी भास्कर अल्ली सुहास कुलकर्णी जमीर तांबोळी महमद तांबोळी दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप डॉ अन्वर होटगी कर सह अन्य पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments