दिनांक 24/01/2026 रोजी वळसंग पोलीस ठाणेचे सपोनि / राहुल डोंगरे, सोबत होटगी दुरक्षेत्र कडील अंमलददार सपोफी/निबाळे, पोह/ 1685 अमोल यादव, पोह/1858 जाधवर, पोकॉ/2124 शंकर पाटील असे मद्रे गावात जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणु अनुशंगाने बुथ पाहणी करुन मद्रे ते आहेरवाडी जाणारे रस्त्याने पेट्रोलींग करीत असतांना मद्रे शिवारात रस्त्याचे कडेला राजु टिळेकर यांचे बांधकाम सुरु असलेले ठिकाणी पत्राचे कम्पांऊंडचे आडोशाला एक आयशर टेम्पो संशयात रित्या थांबलेली दिसल्याने त्यांचा पोलीसांना संशय आल्याने सदर ठिकाणी वरील स्टाफ व दोन पंचासमक्ष जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी थांबलेल्या टेम्पो जवळील 3 ते 4 इसम हे पळून गेले. व सदर ठिकाणी असलेल्या पत्राचे गोडावुन हे संशयीत वाटल्याने त्याचा दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विना परवाना देशी दारु बनविण्याचा करण्याचा कारखाना असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणचा सविस्तर पंचनामा करुन सदर जागेचे मालक 1) राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर रा. मद्रे ता. द. सोलापूर व त्यांचे भागीदीर कारखाना चालविणारे 2) दिनू शेठ उर्फ गुषण पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) रा धुळे व वाहन क्र. MH-40-CD- चे चालक व मालक (नाव माहीत नाही) यांचे संगणनमताने सदरचा कारखाना सुरु असुन सदर कारखान्यात स्वयंचलित चार मशिने, कच्चे रसायनाचे 250 लिटरचे एकुण 122 बॅरल, मोकल्या बाटल्याचे बॉक्स, त्यास लागणारे झाकणचे बॉक्स, व तयार करण्यात आलेले देशी दारु टैंगो पंच रॉकेट देशी दारू भिंगरी देशी दारू, कोंकण प्रिमियम नं.1 देशी दारु 90 मिलीच्या असा प्रकारची बनावट देशी दारु बनविण्यात आलेली होती. सदर कारखान्यात एकुण 1,54,09,650/- किंमतीचा बनावट दारू बनविण्याचे साहित्य व त्यापासून बनविण्यात आलेली बनावट दारू व त्याकरीता वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द वळसंग पोलीस ठाणेत वरील प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि / राहुल डोंगरे हे करीत आहेत. सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1) 1) राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर रा. मद्रे ता. द. सोलापूर यास अटक करण्यात आलेली आहे. व उर्वरीत आरोपी शोध कामी पोलीस ठाणे स्तरावर तीन पथके तयार करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो. श्री अतुल कुलकर्णी साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक सो, श्री.प्रितम यावलकर सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, अक्कलकोट विभाग अक्कलकोट, श्री विलास यामावार सो, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली असुन सदर कारवाई करणेकरीता वळसंग पोलीस ठाणे कडील पोसई रविराज कांबळे, सपोफी/निंबाळे, पोह/1685 अमोल यादव, पोह/1858 जाधवर, पोह/1824 रामदास मालचे, चापोह 444 विजय गायकवाड, पोकाँ/1017 प्रसाद मांढरे, पोकॉ/2124 शंकर पाटील, यांचे सहभागाने मौजे मद्रे शिवारातील असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त करण्यात आलेला आहे.

0 Comments