Advertisement

Main Ad

*नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरीता**जिल्हाधिकारी यांच्यावतीने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती*



सोलापूर, दि. १३ (जिमाका):- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायती यांच्या सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी निवडणूक विषयक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे नोडल अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, खनिकर्म अधिकारी श्रीमती निलिमा जाधव, प्र.जिल्हा सह आयुक्त योगेश डोके, नायब तहसिलदार तथा दुय्यम चिटणीस उत्कर्ष देवकुळे - जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांचेशी समन्वय साधून नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे अनुषंगाने सर्व कामकाजाची पूर्तता करून घेणे, त्याबाबत वेळोवेळी मा.जिल्हाधिकारी यांना अवगत करणे.आचारसंहिता अंमलबजावणी करणे - 
तहसिलदार सं.गां.यो श्रीमती शिल्पा पाटील - सोलापूर जिल्हांतर्गत निवडणूका असलेल्या नगरपरिषद/नगरपंचायतीकडे निवडणूकीसाठी अवाश्यक कर्मचारी नियुक्तीबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून माहिती घेण, कर्मचारी अपुरे पडत असल्यास संबंधित तहसिलदार यांचेकडून तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची माहिती घेवून कर्मचारी उपलब्ध करून देणे. तसेच मा.राज्य निवडणूक आयोग यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करणे. अनुपस्थित कर्मचारी यांचेवर कारवाई करणेबाबत मा.जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर करणे.
 जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे - प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत निहाय निवडणूक कामी आवश्यक साहित्य उपलब्ध असल्याची खात्री करणे. निवडणूक साहित्य ठेवणेसाठी हॉलची उपलब्धता तपासणे. संबंधित पुरवठाधारकाकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यकतेनुसार साहित्य वितरीत होत असल्याची खात्री करणे.
नायब तहसिलदार (आस्थापना शाखा) बालाजी बनसोडे - कायदा व सुव्यवस्था विषयक प्रतिबंधात्मक आदेश काढणे. पोलीस विभागाशी समन्वय ठेवणे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करणे. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रास्त्र जमा करणेबाबत कार्यवाही करणे. आचारसंहिता प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करणे.
उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख - ईव्हीएम व्यवस्थापनाबाबत सर्व कामकाज पाहणे. FLC बाबतची सर्व कार्यवाही करणे. EVM Randamization व ईव्हीएम वितरण बाबतची सर्व कार्यवाही करणे. EVM बाबत सर्व अहवाल तयार करणे. EVM management system) (EMS) सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून मतदान यंत्राशी संबंधित सर्व अहवाल मागविणे. मतदानानातर Polled EVM संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या सुरक्षा कक्षात मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ठेवले गेल्याची खात्री करणे. मतदान दिवस पूर्व, मतदान दिवसावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून EVM अहवाल संकलित करणे. त्याप्रमाणे EMS Software मध्ये अद्यावत करणे/खात्री करणे. मतमोजणी नंतर सर्व मतदान यंत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून स्विकारणे, सुरक्षित ठेवणे व EVM Nodal Officer यांची SOP नुसार कार्यवाही करणे. मा.राज्य निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करणे. निवडणूक कामानिमित्त नेमणेत आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता प्रशिक्षण घेणे.
जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के - राजकीय पक्षांचे, राजकीय जाहिराती तपासणी करून प्रमाणित करणे. Print Media, Internet, SMS यावरील सर्व प्रकारचे जाहिराती तपासणी करून प्रमाणित करणे. निवडणूक खर्च व्यवस्थापन टिमला सदर बाबत माहिती देणे. Social Media Expert नियुक्ती करणे. निवडणूक विषयक सर्व प्रकारच्या पत्रकार परिषदाचे आयोजन करणे व पत्रकारांना आवश्यक ती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांचेकडून मान्यता घेवून त्यानंतर उपलब्ध करुन देणे.
 वृत्तपत्रातील कात्रणे संकलित करुन सादर करणे व कात्रणे संकलित करुन त्यांचे Scanning करुन जतन करुन ठेवणे. महत्वाच्या बातम्या मा. निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तात्काळ निदर्शनास आणून देणे. MCMC कमिटी सदस्य / सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणे. प्रसार माध्यम व अन्य माध्यमाद्वारे प्रसिध्द होणाऱ्या पेड न्युजबाबत कार्यवाही करणे. तसेच मा. राज्य निवडणूक आयोग यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार आवश्यक कार्यवाही करणे.
 नायब तहसिलदार (सामान्य शाखा) एस.सी. परदेशीमठ - तक्रार निवारण कक्षात मतदार यादी संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करणे. नोडल अधिकारी, कायदा व सुव्यवस्था यांचे संपर्कात राहून निवडणूकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीचे निराकरण करणे.
अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे - मा. राज्य निवडणूक आयोग यांनी मतदान केंद्र पालन करणे व त्याची अंमलबजावणी करणे. संबंधात वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशांचे पालन करणे. मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधा, आदर्श मतदान केंद्राची निर्मिती, महिला मतदान केंद्र, मतदान केंद्राच्या बाहेत पक्षाचे मतदार सहाय्य केंद्र उभारणे. मतदान केंद्रात मोबाईल / कॉर्डलेस फोन /वायरलेस फोन वापरण्यास प्रतिबंध, भोजन व्यवस्था , मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा व्यवस्था इत्यादी इत्यादी कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 तहसिलदार पुनर्वसन सरस्वती पाटील - निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी चर्चा करुन Strong Room लोकेशन निश्चित करणे. स्ट्रॉगरुम तयार करुन घेणे. मतमोजणी संपलेनंतर स्ट्रॉगरुम मधील EVM. जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यक्षेत्रात Storage साठी पाठवणे. स्ट्रॉगरुम मधील पोलीस बंदोबस्त लावणे, काढणे बाबत पत्र व्यवहार करणे. स्ट्रॉगरुम मधील CCTV नियोजन करणे, तसेच CCTV रेकोर्डिंग संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करणे. निवडणूकीनंतर मतमोजणी पर्यंत स्ट्रॉग रुम तपासणेकामी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करणे. स्ट्रॉग रुमचा वापर संपलेनंतर CCTV, DVR व इतर साहित्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे ताब्यात देणे.
प्र. जिल्हा सह आयुक्त योगेश डोके, नायब तहसिलदार विकास पवार, तांत्रिक सहाय्यक मलिक बागवान, कर व प्रशासकीय अधिकारी नितेश सोनवणे, लेखापाल नगरविकास शाखा पी.आर.जोशी, लिपिक नगरविकास शाखा आकाश गाजरे - मा. राज्य निवडणूक आयोग यांनी मतदान व मतमोजणी संदर्भात दिलेल्या सूचना निर्देशानुसार अहवाल सादर करणे, मतदानाचे आदले दिवशीचे सर्व अहवाल मा. राज्य निवडणूक आयोग कार्यालयास पाठविणे. मतदानाचे दिवशीचे सर्व अहवाल मा. राज्य निवडणूक आयोग कार्यालयास पाठविणे, मतदानाची टक्केवारी व सर्व अहवाल मा. राज्य निवडणूक आयोग कार्यालयास पाठविणे. मतमोजणी दिवशीचे सर्व अहवाल, मतमोजणी मतमोजणीचे तयारीचे (Dryrun) दिवशीचे मतमोजणी झालेनंतरचे विविध अहवाल मा. राज्य निवडणूक आयोगास सादर करणे. सर्व नोडल अधिकारी यांच्याशी समन्वय साधून निवडणूक वेळापत्रकाप्रमाणे सर्व अहवाल मा. राज्य निवडणूक आयोग म.रा. मुंबई यांना सादर करणे.
अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी - निवडणूक कामानिमित्त नेमणेत आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांचेकरिता मतमोजणी प्रशिक्षण घेणे.
उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर - निवडणूक कामानिमित्त नेमणेत आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता नामनिर्देशन पत्र तपासणी व चिन्ह वाटपबाबत प्रशिक्षण घेणे.
00000

Post a Comment

0 Comments