रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आणि मिडियांनी चौकशी न करताच त्यांच्या निधनाची बातमी पसरवली..त्याच मिडीयावरती विश्वासाने अनेकांनी श्रद्धांजली वाहिली व पोस्ट केली,अगदी केंद्रीय मंत्री पासुन ते भले मोठे दिग्गज नेते यांनी देखील श्रद्धांजली वाहिली, हेमामालिनी,ईशा,बॉबी देओल हे गाडीत स्तब्ध आहेत तरिही मिडीयावाले त्यांच्या वरती कॅमरे लावुन चक्का जाम करीत आहेत, प्रसंग काय आहे, त्यांच्या वरती दुःखाची वेळ आहे त्यांना देखील यातना होतात मनात धाकधूक आहे, बातमी जरुर बनवा परंतु परिस्थितीचे भान ठेवा,आवडत्या नेत्याला,अभिनेत्याला जीवापाड प्रेम करतांना त्यांची अवस्था ओळखली पाहिजे,अति प्रमाणावर त्यांना महत्त्व ही देऊ नये,असाच एक व्हिडिओ फेसबुकवर वायरल झाला की त्यात सनी देओल यांनी हात जोडत चिडुन आई बहिण मुले नाहित का म्हणाले,त्यांच्याशी संवाद नक्कीच करा,संवाद साधण्यापुर्वीच त्यांच्या वरती काय वेळ आहे हे जाणुन घेत पुढे सरकले पाहिजे.फेसबुकवर अनेक फेक वार्ता असतात,फिल्मी दुनियेतील कलावंतांचे तर दोन दिवसांनी वाढदिवसाच्या तर मृत्यू झाल्याच्या पोस्ट असतात,सर्व सामान्यच नव्हे तर भले मोठे दिग्गज देखील त्यावर खात्री करुन न घेता सरळ मत व्यक्त करुन मोकळे होतात, फिल्मी मधील सिन बाहेर मात्र सत्याची जाणीव देत विचलित करतात, गरज राहिल वास्तवतेची..फिल्मी दुनियेतील कलावंत वेगळ्याच दुनियेत जगतात,मायावी जगात कुठेही त्यांना समाधानाचा सुस्कारा सोडता येत नाही,इतके ऐश्वर्य धन संपदा तरिही मृत्यु नंतर त्याच समशानात दहन,दफन होतात,मनाला भुरळ घालणा-या चेह-यांचे खरे चेहरे तिथे समोर येतात,तिथे ॲक्शन,रिटेक नसतो तर तिथे असते केवळ हुंदके,अश्रु, दुःखात सहभागी झालेले मानवी देहाचे आक्रंदन..कारण ते ही एक माणसेच आहेत दुःखाला मनात साठवुन समोरच्याला स्मित हास्य करुन बळजबरीने आनंद देणारी हाडामासांची कलाकार असतात.
गणेश रानबा वाघमारे,
सामाजिक कार्यकर्ता,धाराशिव.

0 Comments