पंढरपूर, दि-११ :- राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी परिवहन मंत्री श्री.सरनाईक व शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, खाजगी सचिव अनिकेत मानोरकर, मंदीर समितीचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
***********
*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भक्ती सागर येथील केली पाहणी*
कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधीत 65 एकर (भक्ती सागर), येथे मोठ्या प्रमाणावर दिंड्या तसेच वारकरी भाविक मुक्कामी असतात. या ठिकाणी प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 65 एकर (भक्ती सागर), येथे भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षित विद्युत व्यवस्था, सुलभ शौचालय, प्रखर प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्धते बाबत माहिती घेतली. तसेच आवश्यक ठिकाणी मुरमीकरण, रस्ते दुरुस्ती तात्काळ करावी अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या

0 Comments