सोलापूर दि.18 (जिमाका) - महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टल द्वारे अर्ज स्विकारण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी सोलापूर शहरातील व तालुक्याच्या ठिकाणातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज केले होते अशा विद्यार्थ्यांनी आपला नुतनीकरण (Renewal) अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी सन 2025-26 करिता नुतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
00000

0 Comments