*जिल्ह्यातील १५ वर्षाखालील व्हॉलीबॉल खेळाडूंनी निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
सोलापूर, दि. १२ (जिमाका) – आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप २०२५ ही स्पर्धा दिनांक ०४ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान शांग्लूओधीन, चीन येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ वर्षाखालील मुले व मुलींसाठी असून भारताचा शालेय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील १५ वर्षाखालील व्हॉलीबॉल खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आवाहन केले आहे.
* राष्ट्रीय निवड चाचणी
भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय संघ निवडीसाठी दिनांक २५ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
- मुले: २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रिपोर्टिंग, २७ ऑगस्टला प्रस्थान
- मुली: २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रिपोर्टिंग, ३० ऑगस्टला प्रस्थान
* राज्य निवड चाचणी
राज्य संघ निवडीसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी पुण्यातच २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
त्यासाठी थेट विभागीय निवड चाचणी १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र मंडळाचे चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय, पुणे येथे सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
*महत्त्वाचे दस्तऐवज
निवड चाचणीसाठी सहभागी खेळाडूंनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत:
- जन्म दाखला (सरकारी प्राधिकरणाकडून)
- आधार कार्ड
- शाळेतील इयत्ता पहिलीमधील प्रवेशाचा जनरल रजिस्टरची छायांकित प्रत
- पासपोर्ट (डिसेंबर २०२५ पासून किमान ६ महिन्यांची वैधता आवश्यक)
- ५ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीवर)
* संपर्क
निवड चाचणीसाठी अधिक माहितीसाठी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी श्री. दत्तात्रय वरकड यांच्याशी मो. ७२१९१५५२५२ वर संपर्क साधावा.
*********

0 Comments