Advertisement

Main Ad

ध्वज संहितेच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनसोलापूर, दिनांक 11 (जिमाका):- केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या

 निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही. तसेच राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देवू नयेत. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नांवे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार दंडनीय अपराध आहे.
तरी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी या नात्याने सोलापूर जिल्हयातील सर्व जनतेस १५ ऑगस्ट २०२५ भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छासह ध्वज संहितेच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित भोसले यांनी केले आहे.
0000

Post a Comment

0 Comments